दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी गोंडखेळ तालुका जामनेर या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र पाल, आयोजित राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान 2026-27 अंतर्गत नैसर्गिक शेती या विषयी शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाला डॉ महेश महाजन वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र पाल , यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्री जितेंद्र पाटील तालुका कृषी अधिकारी जामनेर यांनी मनोगत व्यक्त केले., श्री रवींद्र गुजर DPO pmfme , शासकीय योजनेविषयी माहिती दिली श्री अतूल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र पाल यांनी नैसर्गिक शेती या विषयावर प्रशिक्षण दिले व श्री संग्रामसिंग राजपूत FMT यांच्या नैसर्गिक शेती क्षेत्रावर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले., श्री राकेश कापगते शास्त्रज्ञ पशु विज्ञान कृषी विज्ञान केंद्र पाल. यांनी शेतकऱ्यांना पशुधन व्यवस्थापन या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात श्री. संग्रामसिंग राजपूत यांनी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनमोल सहकार्य केले. या कार्यक्रमात श्री राकेश पाटील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जामनेर, श्री राहुल बाविस्कर, उप कृषी अधिकारी व गोंडखेळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
Connect with us for training, demonstrations, or agricultural guidance. We're here to help farmers succeed.